एस्तेर 5
5
एस्तेर राजाला व हामानाला मेजवानीचे आमंत्रण देते
1तिसर्या दिवशी एस्तेर राणी आपली राजकीय वस्त्रे धारण करून राजमंदिराच्या आतल्या चौकात जाऊन राजमंदिरासमोर उभी राहिली; राजा राजमंदिरात सिंहासनावर राजद्वारासमोर बसला होता.
2राजाने एस्तेर राणी अंगणात उभी आहे असे पाहिले तेव्हा त्याची तिच्यावर कृपादृष्टी झाली; आणि राजाने आपल्या हाती असलेला सुवर्णदंड पुढे केला. तेव्हा एस्तेरने जवळ जाऊन राजदंडाच्या टोकाला स्पर्श केला.
3राजाने तिला विचारले, “एस्तेर राणी, तुला काय पाहिजे? तुझी काय मागणी आहे? अर्ध्या राज्याएवढी तुझी मागणी असली तरी ती मिळेल.”
4एस्तेर म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस आले तर मी आज आपणासाठी जे भोजन तयार केले आहे त्याला आपण हामानास घेऊन यावे.”
5राजा म्हणाला, “जा, हामानास लवकर घेऊन या, म्हणजे एस्तेरच्या म्हणण्याप्रमाणे करू.” मग एस्तेरने तयार केलेल्या भोजनास राजा व हामान हे गेले.
6जेवताना द्राक्षारस पिण्याच्या वेळी राजाने एस्तेरला विचारले, “तुझा काय अर्ज आहे? तो मान्य केला जाईल; तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्याएवढी असली तरी तिच्याप्रमाणे करण्यात येईल.”
7एस्तेर म्हणाली, “माझा अर्ज व मागणी हीच : 8महाराजांची माझ्यावर कृपादृष्टी झाली असून माझा अर्ज मंजूर करावा व माझी मागणी मान्य करावी असे महाराजांच्या मर्जीस आले असेल तर मी मेजवानी करणार तिला महाराजांनी व हामानाने यावे, मग महाराजांनी म्हटल्याप्रमाणे मी उद्या काय मागायचे ते मागेन.” मर्दखयासाठी फाशीचा खांब 9त्या दिवशी हामान आनंदित व प्रसन्नचित्त होऊन बाहेर निघाला; पण राजवाड्याच्या दरवाजाजवळ आपणास पाहून मर्दखय उठला नाही की थरथर कापला नाही हे हामानाने पाहिले तेव्हा त्याचा त्याला फार क्रोध आला;
10तरी आपला क्रोध आवरून हामान घरी गेला आणि त्याने आपले इष्टमित्र व आपली स्त्री जेरेश ह्यांना बोलावणे पाठवून आणले.
11आपल्या धनसंपत्तीची थोरवी, आपल्या संततीचा विस्तार, राजाने आपणांस कशी बढती देऊन राजाचे सरदार व सेवक ह्यांच्यावरील उच्च पद दिले, हे सर्व त्याने त्यांना निवेदन केले.
12हामानाने त्यांना आणखी सांगितले की, “एस्तेर राणीने मेजवानी दिली, त्या मेजवानीस तिने राजाबरोबर माझ्याखेरीज दुसर्या कोणालाही बोलावले नाही; उद्याही तिने मला राजाबरोबर आमंत्रण दिले आहे.
13एवढे असूनही तो मर्दखय यहूदी राजद्वारी बसलेला माझ्या दृष्टीला पडत आहे तोवर हे सर्व व्यर्थ आहे.”
14तेव्हा त्याची स्त्री जेरेश व त्याचे सर्व मित्र त्याला म्हणाले, “पन्नास हात उंचीचा फाशी देण्याचा एक खांब उभा करावा आणि उद्या सकाळी राजाला विनंती करा की मर्दखयास त्यावर फाशी द्यावे; मग तुम्ही आनंदाने राजाबरोबर मेजवानीस जा.” ही गोष्ट हामानास पसंत पडून त्याने फाशीचा खांब तयार करवून घेतला.
सध्या निवडलेले:
एस्तेर 5: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.