हथाकाने येऊन मर्दखयाचे म्हणणे एस्तेरला सांगितले. तेव्हा एस्तेरने हथाकाबरोबर मर्दखयास सांगून पाठवले की, “राजाचे सर्व सेवक व राजाच्या सर्व परगण्यांतील लोक जाणून आहेत की कोणी पुरुष अगर स्त्री बोलावल्यावाचून आतल्या चौकात राजाकडे गेली तर त्याला अथवा तिला प्राणदंड करावा असा सक्त हुकूम आहे; मात्र राजा आपला सोन्याचा राजदंड ज्याच्यापुढे करील त्याचाच बचाव होणार; मला तर आज तीस दिवस राजाकडून बोलावणे आले नाही.” एस्तेरचे हे म्हणणे मर्दखयास कळवण्यात आले. तेव्हा त्याने त्याच्या हस्ते एस्तेरला सांगून पाठवले की, “तू राजमंदिरात आहेस म्हणून तू यहूदी लोकांतून वाचून राहशील असे तुझ्या मनास वाटू देऊ नकोस. तू ह्या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसर्या कोठूनही यहूद्यांची सुटका व उद्धार होईलच. पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला ह्या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून?”
एस्तेर 4 वाचा
ऐका एस्तेर 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: एस्तेर 4:9-14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ