YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एस्तेर 3:7-9

एस्तेर 3:7-9 MARVBSI

अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी त्यांनी पहिल्या म्हणजे नीसान महिन्यापासून हामानासमक्ष पूर (चिठ्ठ्या) टाकायला लावल्या. हा क्रम दररोज, दरमहा, बारावा महिना अदार संपेपर्यंत चालू राहिला. हामान अहश्वेरोश राजाला म्हणाला, “आपल्या साम्राज्यातील सर्व प्रांतांतून राहणार्‍या देशोदेशींच्या लोकांमध्ये पांगलेले व विखरलेले एक राष्ट्र आहे; त्या लोकांचे कायदे इतर सर्व लोकांच्या कायद्यांहून भिन्न आहेत. ते राजाच्या कायद्यांप्रमाणे चालत नाहीत म्हणून त्यांना राहू देणे राजाच्या हिताचे नाही. राजाची मर्जी असल्यास त्यांचा नाश करावा अशी आज्ञा लिहावी; राजभांडारात जमा करण्यासाठी मी दहा हजार किक्कार चांदी राजाच्या कारभार्‍यांच्या हाती देतो.”