ते असे की, तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे; आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे; आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजार्याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. तुम्ही रागवा, परंतु पाप करू नका; तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये; आणि सैतानाला वाव देऊ नका. चोरी करणार्याने पुन्हा चोरी करू नये; तर त्यापेक्षा गरजवंताला देण्यास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करत राहावे. तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरता जे चांगले तेच मात्र निघो, ह्यासाठी की, तेणेकडून ऐकणार्यांना कृपादान प्राप्त व्हावे. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका; खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुमच्यापासून दूर करण्यात येवोत
इफिसकरांस पत्र 4 वाचा
ऐका इफिसकरांस पत्र 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: इफिसकरांस पत्र 4:22-31
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ