रानात तू आपला देव परमेश्वर ह्याला संतापवलेस त्याची आठवण ठेव, विसरू नकोस; मिसर देशातून तुम्ही बाहेर निघालात तेव्हापासून ह्या ठिकाणी येऊन पोहचेपर्यंत तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंडच करीत आला आहात. तसेच होरेबातही तुम्ही परमेश्वराला संतापवले, तेव्हा तो इतका रागावला की, तो तुमचा संहारच करणार होता. दगडी पाट्या म्हणजे परमेश्वराने तुमच्याशी केलेल्या कराराच्या पाट्या घेण्यासाठी मी पर्वतावर चढून गेलो, तेव्हा मी तेथे चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिलो; त्या अवधीत मी भाकर खाल्ली नाही आणि पाणीही प्यालो नाही. आणि देवाच्या बोटाने लिहिलेल्या दोन दगडी पाट्या परमेश्वराने मला दिल्या; आणि मंडळी जमली होती त्या दिवशी जेवढी वचने परमेश्वराने पर्वतावर अग्नीतून तुम्हांला सांगितली तेवढी सर्व त्या पाट्यांवर होती. चाळीस दिवस व चाळीस रात्री लोटल्यावर परमेश्वराने त्या दोन दगडी पाट्या म्हणजे कराराच्या पाट्या मला दिल्या. तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, ‘ऊठ, येथून लवकर खाली जा; कारण ज्या तुझ्या लोकांना तू मिसर देशातून काढून आणलेस ते बिघडले आहेत, आणि ज्या मार्गाने जावे म्हणून मी त्यांना आज्ञापिले होते तो एवढ्यातच सोडून ते बहकून गेले आहेत; त्यांनी स्वतःसाठी एक ओतीव मूर्ती केली आहे.’ परमेश्वर आणखी मला म्हणाला, ‘मी ह्या लोकांना पाहिले आहे, ते ताठ मानेचे लोक आहेत. मला अडवू नकोस, मला त्यांचा संहार करू दे, आणि पृथ्वीवरून1 त्यांचे नाव नाहीसे करू दे, म्हणजे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ व समर्थ असे तुझेच एक राष्ट्र मी करीन.’ तेव्हा मी मागे फिरून पर्वतावरून उतरत असताना पर्वत अग्नीने जळत होता आणि कराराच्या दोन पाट्या माझ्या दोन्ही हातांत होत्या. मी पाहिले की तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्याविरुद्ध पाप केले होते; तुम्ही स्वतःसाठी एक ओतीव वासरू केले होते व ज्या मार्गाने जावे म्हणून परमेश्वराने तुम्हांला आज्ञापिले होते तो केव्हाच सोडून तुम्ही बहकून गेला होता. तेव्हा मी धरलेल्या त्या दोन पाट्या दोन्ही हातांतून फेकल्या व तुमच्या समक्ष फोडून टाकल्या. तुम्ही परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून पाप केले व त्याला संतापवले; तुम्ही केलेल्या ह्या पापामुळे मी परमेश्वरापुढे पूर्वीप्रमाणेच चाळीस दिवस व चाळीस रात्री पालथा पडून राहिलो; त्या अवधीत मी भाकर खाल्ली नाही व पाणीही प्यालो नाही. परमेश्वर तुमच्यावर इतका संतापला होता की, तो तुमचा संहार करणार होता; त्याचा कोप व संताप पाहून मला भीती वाटली; तथापि ह्या खेपेसही परमेश्वराने माझे ऐकले. परमेश्वर अहरोनावर इतका रागावला होता की, तो त्याचा नाश करणार होता; त्या प्रसंगी त्याच्यासाठीही मी प्रार्थना केली. मग तुमची पापकृती म्हणजे तुम्ही केलेले वासरू घेऊन मी अग्नीत जाळले; नंतर त्याचे फोडून तुकडे केले व कुटून धुळीसारखे बारीक चूर्ण केले व डोंगरावरून वाहणार्या ओढ्यात फेकून दिले.
अनुवाद 9 वाचा
ऐका अनुवाद 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: अनुवाद 9:7-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ