जी आज्ञा मी आज तुम्हांला देत आहे ती सर्व काळजीपूर्वक पाळा, म्हणजे तुम्ही जगाल, बहुगुणित व्हाल आणि तुमच्या पूर्वजांना परमेश्वराने शपथ पूर्वक देऊ केलेल्या देशात प्रवेश करून तो वतन करून घ्याल. तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही ह्याची कसोटी पाहावी म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने गेली चाळीस वर्षे तुला रानातून कोणत्या रीतीने चालवले ह्याचे स्मरण कर. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्या प्रत्येक वचनाने जगेल ह्याची जाणीव तुला व्हावी म्हणून त्याने तुला लीन केले; तुझी उपासमार होऊ दिली, आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. ही चाळीस वर्षे तुझ्या अंगावरचे कपडे जीर्ण झाले नाहीत; आणि तुझे पाय सुजले नाहीत. मनुष्य आपल्या मुलाला शिक्षा करतो, तशी तुझा देव परमेश्वर तुला शिक्षा करत आहे, हे लक्षात ठेव. म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याच्या मार्गांनी चालून व त्याचे भय बाळगून त्याच्या आज्ञा पाळ. कारण तुझा देव परमेश्वर तुला एका उत्तम देशात घेऊन जात आहे; खोर्यात व डोंगरात उगम पावून पाण्याने भरलेले नाले, झरे व ओढे त्यात वाहत आहेत; गहू, जव, द्राक्षवेली, अंजीर व डाळिंबे ह्यांचा तो देश आहे; तो जैतुनवृक्षांचा आणि मधाचा देश आहे. त्या देशात टंचाई न पडता तू अन्न खाशील, तुला कोणत्याही गोष्टीची वाण पडणार नाही; तेथले धोंडे लोहयुक्त आहेत व तेथल्या डोंगरातून तुला तांबे खणून काढता येईल. तू खाऊनपिऊन तृप्त होशील आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या उत्तम देशाबद्दल त्याचा धन्यवाद करशील.
अनुवाद 8 वाचा
ऐका अनुवाद 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: अनुवाद 8:1-10
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ