पाहा, ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही जात आहात त्यात पाळण्यासाठी आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हांला विधी व नियम शिकवले आहेत त्याप्रमाणे तुम्ही चालावे. तुम्ही ते काळजीपूर्वक पाळावेत; कारण त्यामुळे देशोदेशीच्या लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञ व समंजस असे दिसाल; त्या सर्व विधींसंबंधी ऐकून ते म्हणतील की, ‘हे महान राष्ट्र खरोखर बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे.’ कारण आमचा देव परमेश्वर ह्याचा आम्ही धावा करतो तेव्हा तो आमच्याजवळ असतो. ह्याच्यासारखे देव जवळ असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे? हे सारे नियमशास्त्र मी आज तुम्हांला देत आहे. त्यातल्यासारखे यथार्थ विधी व नियम असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे?
अनुवाद 4 वाचा
ऐका अनुवाद 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: अनुवाद 4:5-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ