पण तेथून जरी तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला शरण गेलात आणि पूर्ण जिवेभावे त्याच्या शोधाला लागलात तर तो तुम्हांला पावेल. तू संकटात पडलास आणि ही सर्व अरिष्टे तुझ्यावर आली म्हणजे शेवटी तू आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे वळशील आणि त्याची वाणी ऐकशील; कारण तुझा देव परमेश्वर हा दयाळू देव आहे; तो तुला अंतर देणार नाही, तुझा नाश करणार नाही आणि तुझ्या पूर्वजांशी त्याने शपथपूर्वक केलेला करार तो विसरणार नाही. देवाने पृथ्वीवर मानवाला निर्माण केले तेव्हापासून तुझ्या जन्मापर्यंत होऊन गेलेल्या काळात अशी मोठी गोष्ट कधी घडली होती किंवा ऐकण्यात आली होती काय, हे आकाशाच्या एका सीमेपासून दुसर्या सीमेपर्यंत विचारून पाहा. तुम्ही ऐकले त्याप्रमाणे देवाच्या वाणीचे शब्द ऐकूनही दुसरे कोणी लोक जिवंत राहिले आहेत काय? त्याप्रमाणेच तुमचा देव परमेश्वर ह्याने मिसर देशातून तुमच्यासाठी तुमच्यादेखत संकटे, चिन्हे, चमत्कार, युद्धे, पराक्रमी बाहू आणि उगारलेला हात ह्यांच्या योगे भयप्रद कृत्ये केली तशी कृत्ये करून देवाने आपल्यासाठी एखादे राष्ट्र इतर राष्ट्रांमधून काढून घेण्याचा कधी प्रयत्न केला काय? परमेश्वरच देव आहे व त्याच्याशिवाय दुसरा नाही असे तुला कळावे म्हणून हे तुला दाखवण्यात आले. तुला शिक्षण द्यावे म्हणून आकाशातून त्याने आपली वाणी तुला ऐकवली आणि पृथ्वीवर त्याने तुला आपला महाअग्नी दाखवला आणि अग्नीमधून निघालेले त्याचे शब्द तू ऐकलेस. त्याने तुझ्या पूर्वजांवर प्रीती केली म्हणून त्यांच्यामागून त्यांच्या संतानाला त्याने निवडून घेतले आणि स्वतः आपल्या महासामर्थ्याने त्याने तुला मिसर देशातून बाहेर आणले. तुझ्यापेक्षा महान व सामर्थ्यवान राष्ट्रांना तुझ्यापुढून घालवून देऊन तुला त्यांच्या देशात न्यावे आणि त्यांची भूमी तुला वतन करून द्यावी, म्हणून त्याने तसे केले आहे; आज हे तुम्ही पाहतच आहात. म्हणून आज हे समजून घ्या आणि ध्यानात ठेवा की, वर आकाशात व खाली पृथ्वीवर परमेश्वरच देव आहे, दुसरा कोणी नाही.
अनुवाद 4 वाचा
ऐका अनुवाद 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: अनुवाद 4:29-39
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ