YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 32:1-7

अनुवाद 32:1-7 MARVBSI

“अहो आकाशांनो, लक्ष द्या मी बोलत आहे; पृथ्वी माझ्या तोंडचे शब्द ऐको. पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाची वृष्टी होवो, माझे भाषण दहिवराप्रमाणे ठिबको; कोवळ्या गवतावर जशी पावसाची झिमझिम, हिरवळीवर जशा पावसाच्या सरी, तसे ते वर्षो. मी परमेश्वराच्या नावाची घोषणा करीन; आमच्या देवाची महती वर्णा. तो दुर्ग आहे; त्याची कृती परिपूर्ण आहे; त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत; तो विश्वसनीय देव आहे, त्याच्या ठायी अनीती नाही; तो न्यायी व सरळ आहे. ते बिघडले आहेत, ते त्याचे पुत्र नव्हत, हा त्यांचा दोष आहे; ही विकृत व कुटिल पिढी आहे. अहो मूढ व निर्बुद्ध लोकहो, तुम्ही परमेश्वराची अशी फेड करता काय? ज्याने तुला घडवले तोच तुझा पिता ना? त्यानेच तुला निर्माण केले व स्थापले. पुरातन काळच्या दिवसांचे स्मरण कर, कैक पिढ्यांची वर्षे ध्यानात आण, आपल्या बापाला विचार, तो तुला निवेदन करील; आपल्या वडील जनांस विचार ते तुला सांगतील.