YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 6:6-9

दानीएल 6:6-9 MARVBSI

मग हे अध्यक्ष व प्रांताधिकारी राजाकडे जमावाने आले व त्याला म्हणाले, “दारयावेश महाराज, चिरायू असा. राज्यातले सर्व देशाध्यक्ष, नायब अधिपती, प्रांताधिकारी, मंत्री व सरदार ह्यांनी असा विचार केला आहे की अशी एक राजाज्ञा व्हावी, व अशी सक्त द्वाही फिरवली जावी की, हे राजा, ‘तीस दिवसपर्यंत आपल्याशिवाय कोणत्याही देवाची अथवा मानवाची आराधना कोणी करील तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकावे.’ तर महाराज, ही द्वाही मंजूर करा. फर्मानावर सही करा म्हणजे मेदी व पारसी ह्यांच्या कधी न पालटणार्‍या कायद्याच्या व्यवस्थेप्रमाणे हा ठराव पालटायचा नाही.” तेव्हा दारयावेश राजाने फर्मानावर व द्वाहीवर सही केली.