हे बेलशस्सरा, तू त्याचा पुत्र आहेस. हे सर्व तुला ठाऊक असून तू आपले मन नम्र केले नाहीस; तर स्वर्गीच्या प्रभूबरोबर तू उद्दामपणा केलास; त्याच्या मंदिरातील पात्रे तुझ्यापुढे आणली आहेत; तू, तुझे सरदार, तुझ्या पत्नी व उपपत्नी ही त्यांतून द्राक्षारस प्याली आहेत आणि रुपे, सोने, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण ह्यांची घडलेली दैवते, ज्यांना दिसत नाही, ऐकता येत नाही व समजत नाही, त्यांचे तू स्तवन केलेस; पण ज्याच्या हाती तुझा प्राण आहे व ज्याच्या स्वाधीन तुझे सर्व व्यवहार आहेत त्या देवाला मान दिला नाहीस; म्हणून त्याने ती हाताची बोटे पाठवली व हा लेख लिहिला. हा लिहिलेला लेख असा : मने, मने, तकेल, ऊफारसीन. ह्याचा अर्थ असा : मने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काल मोजून त्याचा अंत केला आहे. तकेल म्हणजे तुला तागडीत तोलले व तू उणा भरलास. परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी व पारसी ह्यांना दिले आहे.”
दानीएल 5 वाचा
ऐका दानीएल 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: दानीएल 5:22-28
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ