हे राजा, परात्पर देवाने तुझा बाप नबुखद्नेस्सर ह्याला राज्य, महत्त्व, वैभव व महिमा ही दिली. त्याने त्याला मोठेपणा दिला म्हणून सर्व लोक, सर्व राष्ट्रांचे व सर्व भाषा बोलणारे लोक त्याच्यापुढे थरथर कापत व त्याला भीत; वाटेल त्याला तो ठार मारी व वाटेल त्याला जिवंत राखी; वाटेल त्याला तो थोर करी व वाटेल त्याला तो नीच करी. पुढे त्याच्या हृदयात ताठा शिरला, व त्याचा आत्मा कठोर होऊन उन्मत्त झाला तेव्हा त्याला त्याच्या राजपदावरून काढण्यात आले व त्याचे वैभव हिरावून घेण्यात आले. त्याला मनुष्यांतून घालवून देण्यात आले; त्याचे हृदय पशूंसारखे झाले; तो रानगाढवांमध्ये वस्ती करू लागला; तो बैलाप्रमाणे गवत खाई व त्याचे शरीर आकाशातील दहिवराने भिजत असे. मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो त्यावर पाहिजे त्याला स्थापतो, असे ज्ञान त्याला होईपर्यंत तो असा राहिला.
दानीएल 5 वाचा
ऐका दानीएल 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: दानीएल 5:18-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ