मग नबुखद्नेस्सर त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीच्या दारानजीक येऊन म्हणाला, “अहो शद्रख, मेशख व अबेद्नगो, परात्पर देवाचे सेवकहो, अग्नीतून बाहेर या.” तेव्हा शद्रख, मेशख व अबेद्नगो अग्नीतून बाहेर आले. आणि राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार व राजमंत्री जे तेथे जमले होते त्यांनी ह्या पुरुषांना पाहिले तेव्हा त्यांच्या शरीरावर अग्नीचा परिणाम झाला नव्हता, त्यांच्या डोक्याचा एक केसही होरपळला नव्हता, त्यांच्या पायमोजांना काही झाले नव्हते आणि अग्नीचा गंधही त्यांना लागला नव्हता. तेव्हा नबुखद्नेस्सर म्हणाला, शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांनी आपल्या देवावर भाव ठेवला, राजाचा शब्द मोडला, आपल्या देवाखेरीज अन्य देवाची सेवा व उपासना करायची नाही म्हणून त्यांनी आपले देह अर्पण केले; त्यांना त्यांच्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सोडवले आहे; त्याचा धन्यवाद असो! ह्याकरता मी फर्मावतो की सर्व लोक, प्रत्येक राष्ट्राचे व प्रत्येक भाषा बोलणारे लोक, ह्यांपैकी जे कोणी शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांच्या देवाविरुद्ध काही बोलतील त्यांचे तुकडे-तुकडे करण्यात येतील; त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येतील; कारण अशा प्रकारे सोडवण्यास समर्थ दुसरा कोणी देव नाही.”
दानीएल 3 वाचा
ऐका दानीएल 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: दानीएल 3:26-29
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ