YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 3:1-7

दानीएल 3:1-7 MARVBSI

नबुखद्नेस्सर राजाने सुवर्णाची एक मूर्ती केली, तिची उंची साठ हात व रुदी सहा हात होती; तिची स्थापना त्याने बाबेल परगण्यातील दूरा नामक मैदानात केली. ही जी मूर्ती नबुखद्नेस्सर राजाने स्थापली होती तिची प्रतिष्ठापना करण्यासाठी त्याने राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार, मंत्री, भांडारी, न्यायपंडित, न्यायाधीश व सुभ्यांचे सर्व अधिकारी ह्यांनी एकत्र जमावे म्हणून त्यांना बोलावणे केले. तेव्हा राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार, मंत्री, भांडारी, न्यायपंडित, न्यायाधीश व सुभ्यांचे सर्व अधिकारी हे नबुखद्नेस्सर राजाने स्थापलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास एकत्र जमले आणि तिच्यासमोर उभे राहिले. मग एका भाटाने मोठ्याने घोषणा केली की, “अहो लोकांनो, निरनिराळ्या राष्ट्रांतील निरनिराळ्या भाषा बोलणार्‍या लोकांनो, तुम्हांला आज्ञा होत आहे की, शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी तुमच्या कानी पडताच नबुखद्नेस्सर राजाने जी सुवर्णमूर्ती स्थापली आहे तिच्यापुढे तुम्ही साष्टांग दंडवत घालावेत; जो कोणी तिला साष्टांग दंडवत घालणार नाही त्याला तत्क्षणीच धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकतील.” तेव्हा शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा वगैरे वाद्यांचा ध्वनी कानी पडताच निरनिराळ्या राष्ट्रांतील निरनिराळ्या भाषा बोलणार्‍या सर्व लोकांनी नबुखद्नेस्सर राजाने स्थापलेल्या त्या सुवर्णमूर्तीपुढे साष्टांग दंडवत घातले.