YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 2:17-23

दानीएल 2:17-23 MARVBSI

ह्यावर दानिएलाने आपल्या घरी जाऊन आपले सोबती हनन्या, मीशाएल व अजर्‍या ह्यांना ही हकीगत कळवली. आणि बाबेलच्या इतर ज्ञान्यांबरोबर आपला व आपल्या सोबत्यांचा घात होऊ नये म्हणून दानिएलाने त्यांना विनंती केली की, ह्या रहस्यासंबंधाने स्वर्गीय देवाने आपणांवर दया करावी असे त्याच्याजवळ मागावे. मग रात्री दृष्टान्तात हे रहस्य दानिएलास प्रकट झाले; त्यावरून दानिएलाने स्वर्गीय देवाचा धन्यवाद केला. दानीएल म्हणाला, “देवाचे नाम युगानुयुग धन्यवादित असो; कारण ज्ञान व बल ही त्याचीच आहेत; तोच प्रसंग व समय बदलतो; तो राजांना स्थानापन्न अथवा स्थानभ्रष्ट करितो; तो ज्ञान्यांस ज्ञान देतो व बुद्धिमानांस बुद्धी देतो. तो गहन व गूढ गोष्टी प्रकट करतो; अंधारात काय आहे हे त्याला ठाऊक असते; त्याच्याजवळ प्रकाश वसतो. हे माझ्या पूर्वजांच्या देवा, मी तुझे उपकार मानतो व तुझे स्तवन करतो की तू मला ज्ञान व बल ही दिली आहेत आणि ज्यासाठी आम्ही तुला विनवले ते तू मला आता कळवले आहेस; तू आम्हांला राजाची गोष्ट कळवली आहेस.”