YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 1:10-13

दानीएल 1:10-13 MARVBSI

खोजांचा सरदार दानिएलास म्हणाला, “माझा स्वामीराजा ह्याने तुमचे खाणेपिणे नेमून ठेवले आहे; त्याचा मला धाक आहे; तुमच्या वयाच्या इतर तरुणांपेक्षा तुमची मुखे म्लान झालेली त्याला का दिसावीत? राजापुढे माझे डोके उडवले जाण्याचा प्रसंग तुम्ही का आणावा?” तेव्हा खोजांच्या सरदाराने दानीएल, हनन्या, मीशाएल, व अजर्‍या ह्यांच्यावर जो कारभारी नेमला होता त्याला दानिएलाने म्हटले, “दहा दिवस आपल्या ह्या दासांवर एवढा प्रयोग करून पाहा, आम्हांला खायला शाकान्न व प्यायला पाणी मात्र दे. नंतर आमची तोंडे पाहा; आणि राजघरचे अन्न खाणार्‍या तरुणांचीही तोंडे पाहा; मग तुझ्या नजरेस येईल तसे तुझ्या ह्या दासांचे कर.”