तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ — ह्याला मूर्तिपूजा म्हणावे — हे जिवे मारा; त्यामुळे आज्ञा मोडणार्या मुलांवर देवाचा कोप होतो. तुम्हीही पूर्वी त्या वासनांमध्ये जगत होता तेव्हा त्यांमध्ये तुम्ही चालत होता. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे, ही सर्व आपणांपासून दूर करा. एकमेकांशी लबाडी करू नका; कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या कृतींसह काढून टाकले आहे; आणि जो नवा मनुष्य, आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे. ह्यात हेल्लेणी व यहूदी, सुंता झालेला व न झालेला, बर्बर व स्कुथी, दास व स्वतंत्र हा भेदच नाही; तर ख्रिस्त सर्वकाही, आणि सर्वांत आहे.
कलस्सै 3 वाचा
ऐका कलस्सै 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: कलस्सै 3:5-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ