मग असे झाले की, पेत्र चहूकडे फिरत असता लोद गावात जे पवित्र जन राहत होते त्यांच्याकडेही गेला. तेथे त्याला ऐनेयास नावाचा एक मनुष्य आढळला; त्याला पक्षाघात झाल्यामुळे तो आठ वर्षे अंथरुणाला खिळलेला होता. त्याला पेत्राने म्हटले, “ऐनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करत आहे, ऊठ व स्वतः आपले अंथरूण नीटनेटके कर.” तेव्हा तो तत्काळ उठला. त्याला पाहून लोद व शारोन येथील सर्व रहिवासी प्रभूकडे वळले. यापोमध्ये टबीथा उर्फ दुर्कस1 ह्या नावाची कोणीएक शिष्या होती; ती सत्कृत्ये व दानधर्म करण्यात तत्पर असे. पुढे असे झाले की, त्या दिवसांत ती आजारी पडून मरण पावली; तेव्हा त्यांनी तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवले. लोद यापोजवळ असल्यामुळे पेत्र तेथे आहे असे जेव्हा शिष्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी दोघा जणांस पाठवून त्याला विनंती केली की, “आमच्याकडे येण्यास उशीर करू नका.” तेव्हा पेत्र त्यांच्याबरोबर गेला. तो तेथे पोहचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले; त्याच्याजवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या आणि दुर्कस त्यांच्याबरोबर होती तेव्हा ती जे अंगरखे व जी वस्त्रे करत असे ती त्यांनी त्याला दाखवली. पण पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली; मग कुडीकडे वळून म्हटले, “टबीथे, ऊठ.” तेव्हा तिने डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली. मग त्याने तिला हात देऊन उठवले; आणि पवित्र जनांना व विधवांना बोलावून त्यांच्यापुढे तिला सजीव असे उभे केले. हे सर्व यापोमध्ये माहीत झाले; आणि पुष्कळांनी प्रभूवर विश्वास ठेवला. नंतर असे झाले की, तो यापोत शिमोन नावाच्या कोणाएका कातडे कमावणार्या चांभाराच्या येथे बरेच दिवस राहिला.
प्रेषितांची कृत्ये 9 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 9:32-43
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ