इकडे दिमिष्कात हनन्या नावाचा कोणीएक शिष्य होता; त्याला प्रभू दृष्टान्तात म्हणाला, “हनन्या!” त्याने म्हटले, “काय प्रभू?” प्रभू त्याला म्हणाला, “उठून नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहूदाच्या घरी तार्सकर शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर; कारण पाहा, तो प्रार्थना करत आहे; आणि आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून हनन्या नावाचा एक मनुष्य आपणावर हात ठेवत आहे असे त्याने पाहिले आहे.” तेव्हा हनन्याने उत्तर दिले, “प्रभो, यरुशलेमेतल्या तुझ्या पवित्र जनांचे ह्या माणसाने किती वाईट केले आहे हे मी पुष्कळांकडून ऐकले आहे; आणि येथेही तुझे नाव घेणार्या सर्वांना बांधावे असा मुख्य याजकांपासून त्याला अधिकार मिळाला आहे.” परंतु प्रभूने त्याला म्हटले, “जा; कारण परराष्ट्रीय, राजे व इस्राएलाची संतती ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे; आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागेल हे मी त्याला दाखवीन.” तेव्हा हनन्या निघाला आणि त्या घरी गेला; आणि त्याच्यावर हात ठेवून म्हणाला, “शौल भाऊ, तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले, त्याने तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावेस म्हणून मला पाठवले आहे.” तत्क्षणी त्याच्या डोळ्यांवरून खपल्यांसारखे काही पडले व त्याला दृष्टी आली आणि त्याने उठून बाप्तिस्मा घेतला. मग अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली. ह्यानंतर तो दिमिष्कातल्या शिष्यांबरोबर काही दिवस राहिला
प्रेषितांची कृत्ये 9 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 9:10-19
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ