YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 8:27-31

प्रेषितांची कृत्ये 8:27-31 MARVBSI

मग तो उठला व निघाला; आणि पाहा, एक कूशी1 षंढ, कूशी1 लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते; तो यरुशलेमेत उपासनेसाठी आला होता. तो परत जाताना आपल्या रथात बसून यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचत होता. तेव्हा आत्म्याने फिलिप्पाला सांगितले, “जा, त्याचा रथ गाठ.” फिलिप्प धावत गेला आणि त्याने त्याला यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचताना ऐकले; त्यावर तो म्हणाला, “आपण जे वाचत आहात ते आपल्याला समजते काय?” त्याने म्हटले, “कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार?” मग त्याने फिलिप्पाला आपल्याजवळ येऊन बसण्यास वर बोलावले.

प्रेषितांची कृत्ये 8:27-31 साठी चलचित्र