प्रमुख याजक म्हणाला, “ह्या गोष्टी अशाच आहेत काय?” तेव्हा तो म्हणाला, “बंधुजनहो व वडिलांनो, ऐका. आपला पूर्वज अब्राहाम हारान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपटेम्या देशात असता ‘गौरवशाली देवाने’ त्याला दर्शन देऊन म्हटले, ‘तू आपला देश व आपले नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात चल.’ तेव्हा तो खास्द्यांच्या देशातून निघून हारानात जाऊन राहिला; मग त्याचा पिता मृत झाल्यावर देवाने त्याला तेथून काढून सध्या तुम्ही राहता त्या देशात आणले. पण त्यात त्याला वतन ‘दिले नाही, पाऊलभरदेखील जमीन दिली नाही;’ त्याला मूलबाळ नव्हते तरी हा देश ‘त्याचा व त्याच्यामागे त्याच्या संततीच्या स्वाधीन कायमचा करण्याचे’ अभिवचन देवाने त्याला दिले. देवाने आणखी असे सांगितले की, ‘त्याची संतती परदेशात जाऊन उपरी होईल आणि ते लोक त्यांना दास करून चारशे वर्षे जाचतील. ज्या राष्ट्राच्या दास्यात ते असतील त्याचे पारिपत्य मी करीन,’ असे देवाने सांगितले; आणि ‘त्यानंतर ते तेथून निघून माझी सेवा ह्या स्थळी करतील.’ त्याने त्याला ‘सुंतेचा करार’ लावून दिला; हा करार झाल्यानंतर अब्राहामाला इसहाक झाला; ‘त्याची त्याने आठव्या दिवशी सुंता केली;’ मग इसहाकाला याकोब झाला व याकोबाला बारा कुलपती झाले. नंतर कुलपतींनी ‘हेव्यामुळे योसेफाला मिसर देशात विकून टाकले’; पण ‘देव त्याच्याबरोबर होता’, त्याने त्याला त्याच्यावरील सर्व संकटांतून सोडवले आणि ‘मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या दृष्टीने कृपापात्र’ व ‘ज्ञानी’ असे केले; म्हणून फारोने त्याला मिसर देशावर व आपल्या सर्व घरावर अधिकारी नेमले. मग ‘सर्व मिसर व कनान ह्या देशांत दुष्काळ पडून’ त्यांच्यावर जबर संकट आले आणि आपल्या पूर्वजांना अन्न मिळेनासे झाले. ‘तेव्हा मिसर देशात धान्य आहे हे ऐकून याकोबाने’ तुमच्याआमच्या पूर्वजांना पहिल्या खेपेस पाठवले. मग दुसर्या खेपेस ‘योसेफाने आपल्या भावांना ओळख दिली’; आणि योसेफाचे कूळ फारो राजाला कळले. तेव्हा योसेफाने, आपला पिता याकोब व आपले सगळे नातलग ‘म्हणजे पंचाहत्तर माणसे ह्यांना’ बोलावून घेतले. ह्याप्रमाणे ‘याकोब मिसर देशात गेला’ आणि तेथे तो व आपले पूर्वजही ‘मरण पावले; त्यांना शखेमात नेले आणि जी कबर अब्राहामाने शखेमात हमोराच्या पुत्रांपासून’ रोख रुपये ‘देऊन विकत घेतली होती तिच्यात त्यांना’ पुरले.
प्रेषितांची कृत्ये 7 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 7
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 7:1-16
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ