YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 6:7-15

प्रेषितांची कृत्ये 6:7-15 MARVBSI

मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला; यरुशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली; याजकवर्गातीलही पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासाला मान्यता दिली. स्तेफन कृपा1 व सामर्थ्य ह्यांनी पूर्ण होऊन लोकांत मोठी अद्भुते व चिन्हे करत असे. तेव्हा लिबिर्तिन नामक लोकांच्या सभास्थानातील काही जण तसेच कुरेनेकर, आलेक्सांद्रियेकर आणि किलिकिया व आसिया ह्यांतील लोकांपैकी कित्येक उठले आणि स्तेफनाबरोबर वितंडवाद घालू लागले. पण तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलत होता त्यांना त्यांच्याने तोंड देववेना. तेव्हा त्यांनी काही लोकांना फूस देऊन, “आम्ही त्याला मोशेविरुद्ध व देवाविरुद्ध दुर्भाषण करताना ऐकले” असे म्हणण्यास पढवले. आणि लोकांना, वडिलांना व शास्त्र्यांना चेतवले. त्यांनी त्याच्यावर चाल करून त्याला धरून न्यासभेपुढे नेले; आणि त्यांनी बनावट साक्षीदार उभे केले; ते म्हणाले, “हा माणूस ह्या पवित्रस्थानाच्या व नियमशास्त्राच्या विरुद्ध बोलण्याचे सोडत नाही; कारण आम्ही त्याला असे बोलताना ऐकले की, हा नासोरी येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आपल्याला लावून दिलेले परिपाठ बदलून टाकील.” तेव्हा न्यायसभेत बसलेले सर्व जण त्याच्याकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले.

प्रेषितांची कृत्ये 6:7-15 साठी चलचित्र