YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 27:18-25

प्रेषितांची कृत्ये 27:18-25 MARVBSI

तेव्हा वादळाने आमचे फार हाल होऊ लागल्यामुळे ते दुसर्‍या दिवशी भरगत टाकून देऊ लागले; आणि तिसर्‍या दिवशी त्यांनी आपल्या हातांनी तारवाचे अवजार टाकून दिले. मग पुष्कळ दिवस सूर्य व तारेही दिसले नाहीत आणि तुफानाचा जोर आम्हांला फारच भासला; त्यामुळे शेवटी आमची तरण्याची आशा हळूहळू सोडून द्यावी लागली. तेव्हा त्यांना पुष्कळ दिवस उपास पडल्यावर पौल त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला, “गृहस्थहो, तुम्ही माझे ऐकायचे होते, क्रेताहून निघायचे नव्हते, म्हणजे हे हाल व ही हानी टळली असती. तरी मी आता तुम्हांला सांगतो की, धैर्य धरा; तुमच्यापैकी कोणाच्याही जिवाचा नाश होणार नाही, तारवाचा मात्र होईल; कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी सेवा करतो त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, ‘पौला, भिऊ नकोस; तुला कैसरापुढे उभे राहिले पाहिजे; आणि पाहा, तुझ्याबरोबर जे तारवातून चालले आहेत ते सर्व देवाने तुला दिले आहेत.’ म्हणून गृहस्थांनो, धैर्य धरा; माझा देवावर भरवसा आहे की त्याने मला जसे कळवले तसेच घडेल.

प्रेषितांची कृत्ये 27:18-25 साठी चलचित्र