YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 21:37-40

प्रेषितांची कृत्ये 21:37-40 MARVBSI

मग पौलाला गढीत नेणार इतक्यात त्याने सरदाराला म्हटले, “मला आपल्याबरोबर काही बोलायची परवानगी मिळेल का?” तो म्हणाला, “हेल्लेणी भाषा तुला येते काय? ज्या मिसर्‍याने थोड्या दिवसांमागे बंड उठवून त्या चार हजार मारेकर्‍यांना रानात नेले तोच तू आहेस की नाही?” तेव्हा पौलाने म्हटले, “मी किलिकियातील तार्सकर यहूदी आहे; हलक्यासलक्या नगराचा राहणारा नव्हे. मी आपल्याला विनंती करतो की, लोकांबरोबर बोलण्याची मला परवानगी द्या.” त्याने परवानगी दिल्यावर पौलाने पायर्‍यांवर उभे राहून लोकांना हाताने खुणावले; आणि अगदी शांत झाल्यावर तो त्यांच्याबरोबर इब्री भाषेत येणेप्रमाणे बोलला

प्रेषितांची कृत्ये 21:37-40 साठी चलचित्र