त्या दिवसांनंतर आम्ही आपली तयारी करून यरुशलेमेस वर गेलो. आमच्याबरोबर कैसरीयातील कित्येक शिष्यही आले. त्यांनी आपल्याबरोबर कुप्र येथील म्नासोन ह्या जुन्या शिष्याला आणले; त्याच्या येथे आम्ही राहणार होतो. यरुशलेमेत आल्यावर बंधुजनांनी आनंदाने आमचे आगतस्वागत केले. मग दुसर्या दिवशी पौल आमच्यासह याकोबाच्या येथे गेला; आणि सर्व वडीलही तेथे आले. तेव्हा त्याने त्यांना भेटून आपल्या सेवेच्या योगे जी कार्ये देवाने परराष्ट्रीयांमध्ये केली होती त्या एकेकाविषयी सविस्तर सांगितले. ते ऐकून त्यांनी देवाचा गौरव केला व पौलाला म्हटले, “भाऊ, ज्यांनी विश्वास ठेवला आहे असे हजारो लोक यहूद्यांमध्ये आहेत हे तुम्ही पाहतच आहात; ते सर्व नियमशास्त्राभिमानी आहेत. तुमच्याविषयी त्यांना असे कळवण्यात आले आहे की, तुम्ही परराष्ट्रीयांत राहणार्या सर्व यहूद्यांना मोशेचा त्याग करायला शिकवत असता आणि आपल्या मुलांची सुंता करू नये व परिपाठाप्रमाणे चालू नये असेही सांगत असता. तर आता काय करावे? तुम्ही आला आहात हे ते खचीत ऐकतील. म्हणून आम्ही तुम्हांला जे सांगतो ते करा. ज्यांनी नवस केला आहे असे आमच्यात चौघे जण आहेत; त्यांना घेऊन त्यांच्यासह तुम्ही व्रतस्थ व्हा, आणि त्यांनी मुंडण करावे म्हणून त्यांचा खर्च तुम्ही भरा म्हणजे तुमच्याविषयी जे कळवण्यात आले आहे त्यात काही अर्थ नसून तुम्ही स्वतः नियमशास्त्र पाळून व्यवस्थित वागता हे सर्वांना कळून येईल. परंतु ज्यांनी विश्वास ठेवला आहे अशा परराष्ट्रीयांसंबंधाने आम्ही निर्णय करून लिहून पाठवले आहे की, त्यांनी [असा काही नियम पाळू नये फक्त] मूर्तीला अर्पण केलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व जारकर्म ह्यांपासून अलिप्त राहावे.” तेव्हा पौल त्या माणसांना घेऊन दुसर्या दिवशी त्यांच्याबरोबर व्रतस्थ होऊन मंदिरात गेला, आणि ज्या दिवशी त्यांच्यातील एकेकासाठी अर्पण करायचे त्या दिवसापर्यंत व्रताचे दिवस आपण पूर्ण करत आहोत असे त्याने दाखवले. ते सात दिवस पूर्ण होण्याच्या सुमारास आशिया प्रांतातल्या यहूद्यांनी त्याला मंदिरात पाहून सर्व लोकसमुदायाला चिथवले, आणि त्याच्यावर हात टाकून आरोळी मारून म्हटले, “अहो इस्राएल लोकांनो, धावा हो धावा; आपले लोक, नियमशास्त्र व हे स्थळ ह्यांच्याविरुद्ध जो चहूकडे सर्वांना शिकवतो तोच हा आहे; शिवाय ह्याने हेल्लेण्यांस मंदिरात आणून हे पवित्रस्थान विटाळवले आहे.” त्यांनी इफिसकर त्रफिम ह्याला पूर्वी त्याच्याबरोबर शहरात पाहिले होते; त्याला पौलाने मंदिरात आणले असावे, अशी त्यांची कल्पना होती. तेव्हा सर्व शहर गजबजून उठले व लोकांची एकच गर्दी झाली; आणि त्यांनी पौलाला धरून मंदिरातून बाहेर ओढून काढले; आणि लगेच दरवाजे बंद करण्यात आले. मग ते त्याला जिवे मारू पाहत असता पलटणीच्या सरदाराकडे बातमी लागली की, सबंध यरुशलेमेत गडबड उडाली आहे. तत्काळ तो शिपाई व शताधिपती ह्यांना घेऊन त्यांच्याकडे खाली धावत गेला. सरदार व शिपाई ह्यांना पाहून त्यांनी पौलाला मारायचे थांबवले. तेव्हा सरदाराने जवळ येऊन त्याला धरले आणि दोन साखळ्यांनी बांधण्याचा हुकूम केला; मग ‘हा कोण व ह्याने काय केले’ असे तो विचारू लागला. तेव्हा लोकांतून कोणी काही, कोणी काही ओरडू लागले; ह्या गलबल्यामुळे त्याला खातरीलायक असे काही कळेना, म्हणून त्याने त्याला गढीत नेण्याचा हुकूम केला. तो पायर्यांवर आला तेव्हा असे झाले की, लोकांच्या दांडगाईमुळे शिपायांनी त्याला उचलून नेले; कारण लोकांचा समुदाय मागे चालत असून, “त्याची वाट लावा,” असे ओरडत होता.
प्रेषितांची कृत्ये 21 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 21
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 21:15-36
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ