YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 20:7-12

प्रेषितांची कृत्ये 20:7-12 MARVBSI

मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो तेव्हा पौलाने त्यांच्याबरोबर भाषण केले; तो दुसर्‍या दिवशी जाणार होता आणि त्याने आपले भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबवले. ज्या माडीवर आम्ही एकत्र जमलो होतो तेथे बरेच दिवे होते. आणि युतुख नावाचा कोणीएक तरुण खिडकीत बसला असता झोपेने गुंगला होता. तेव्हा पौल फार वेळ भाषण करत राहिल्यामुळे तो झोपेच्या गुंगीत तिसर्‍या मजल्यावरून खाली पडला व मेलेला हाती लागला. तेव्हा पौल खाली उतरला आणि त्याच्यावर पाखर घालून व त्याला कवटाळून म्हणाला, “घाबरू नका; कारण हा अजून जिवंत आहे.” मग त्याने वर येऊन भाकर मोडून खाल्ल्यावर बराच वेळ म्हणजे पहाटपर्यंत त्यांच्याबरोबर संभाषण केले व तो तसाच निघून गेला. त्या तरुणाला जिवंत नेता आल्यामुळे त्यांना फार समाधान वाटले.

प्रेषितांची कृत्ये 20:7-12 साठी चलचित्र