YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 2:3-8

प्रेषितांची कृत्ये 2:3-8 MARVBSI

आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एकेक अशा बसल्या. तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले. त्या वेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहूदी यरुशलेमेत राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला; कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्‍चर्याने थक्क होऊन म्हणाले, “पाहा, हे बोलणारे सर्व गालीली ना? तर आपण प्रत्येक जण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे?

प्रेषितांची कृत्ये 2:3-8 साठी चलचित्र