नंतर पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले होते. तेव्हा अकस्मात मोठ्या वार्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एकेक अशा बसल्या. तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले. त्या वेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहूदी यरुशलेमेत राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला; कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, “पाहा, हे बोलणारे सर्व गालीली ना? तर आपण प्रत्येक जण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहूदीया, कप्पदुकिया, पंत, आसिया, फ्रुगिया, पंफूलिया, मिसर व कुरणेच्या जवळचा लिबुवा देश ह्यांत राहणारे, यहूदी व यहूदीयमतानुसारी असे रोमी प्रवासी, क्रेतीय, अरब, असे आपण त्यांना आपापल्या भाषांत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो.” तेव्हा ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकांना म्हणाले, “हे काय असेल?” परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, “हे द्राक्षारसाने मस्त झाले आहेत.”
प्रेषितांची कृत्ये 2 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 2:1-13
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ