देवाने पौलाच्या हातून असाधारण चमत्कारही घडवले; ते असे की, रुमाल किंवा फडकी त्याच्या अंगावरून आणून रोग्यांवर घातली म्हणजे त्यांचे रोग दूर होत असत व दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असत. तेव्हा कित्येक पंचाक्षरी फिरस्ते यहूदी, दुष्ट आत्मे लागलेल्या लोकांवर प्रभू येशूचे नाव उच्चारून म्हणू लागले, “ज्या येशूची पौल घोषणा करतो त्याची मी तुम्हांला शपथ घालतो.” एक यहूदी मुख्य याजक स्किवा ह्याला सात मुलगे होते, ते असे करत होते. त्यांना दुष्ट आत्म्याने उत्तर दिले, “येशूला मी ओळखतो व पौलाची मला माहिती आहे; पण तुम्ही कोण आहात?” मग ज्या माणसाला दुष्ट आत्मा लागला होता त्याने त्यांच्यावर उडी घालून दोघांना हटवले आणि त्यांच्यावर इतकी जरब बसवली की ते त्या घरातून घायाळ व उघडेनागडे होऊन पळून गेले. मग इफिसात राहणारे यहूदी व हेल्लेणी ह्या सर्वांना हे कळले, तेव्हा ते भयभीत झाले आणि प्रभू येशूच्या नावाचा महिमा झाला. विश्वास ठेवणार्या लोकांपैकी पुष्कळ जणांनी येऊन आपली कृत्ये उदारपणे पदरात घेतली. जादूटोणा करणार्यांपैकी बर्याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांदेखत जाळून टाकली; आणि त्यांच्या किमतीची बेरीज केली तेव्हा ती पन्नास हजार रुपये झाली. ह्याप्रमाणे प्रभूच्या सामर्थ्याचे वचन वाढत जाऊन प्रबल झाले.
प्रेषितांची कृत्ये 19 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 19
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 19:11-20
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ