मग असे झाले की, अपुल्लो करिंथात असता पौल वरच्या प्रांतामधून जाऊन इफिसास पोहचला; तेथे कित्येक शिष्य त्याला आढळले. त्यांना तो म्हणाला, “तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हांला पवित्र आत्मा मिळाला काय?” त्यांनी त्याला म्हटले, “पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकलेही नाही.” तो त्यांना म्हणाला, “तर तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतलात?” ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा.” पौलाने म्हटले, “योहान पश्चात्तापाचा बाप्तिस्मा देत असे; तो लोकांना सांगत असे की, माझ्यामागून येणार्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा.” हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला; आणि पौलाने त्यांच्यावर हात ठेवले, तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला; ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले. ते सगळे सुमारे बारा पुरुष होते.
प्रेषितांची कृत्ये 19 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 19
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 19:1-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ