YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 16:25-34

प्रेषितांची कृत्ये 16:25-34 MARVBSI

मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाये डगमगले; सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. तेव्हा बंदिशाळेच्या नायकाने जागे होऊन बंदिशाळेचे दरवाजे उघडे पाहिले; आणि बंदिवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तलवार उपसून आपला घात करणार होता. इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, “तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस; कारण आम्ही सर्व जण येथेच आहोत.” मग दिवे आणवून तो आत धावत गेला, कापत कापत पौल व सीला ह्यांच्या पाया पडला, आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, “महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे?” ते म्हणाले, “प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.” त्यांनी त्याला व त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. मग रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या; आणि तेव्हाच त्याने व त्याच्या घरच्या सर्व माणसांनी बाप्तिस्मा घेतला. मग त्याने त्यांना घरी नेऊन जेवू घातले आणि देवावर विश्वास ठेवून त्याने व त्याच्या घरच्या सर्व मंडळीने आनंदोत्सव केला.

प्रेषितांची कृत्ये 16:25-34 साठी चलचित्र