YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 11:19-30

प्रेषितांची कृत्ये 11:19-30 MARVBSI

स्तेफनावरून उद्भवलेल्या छळामुळे ज्यांची पांगापांग झाली होती ते फेनिके, कुप्र व अंत्युखिया येथपर्यंत फिरून यहूद्यांना मात्र देवाचे वचन सांगत असत. तरी त्यांच्यापैकी कित्येक कुप्री व कुरेनेकर होते; ते अंत्युखियात येऊन प्रभू येशूची सुवार्ता हेल्लेणी लोकांनाही सांगू लागले. तेव्हा प्रभूचा हात त्यांच्याबरोबर होता आणि पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळले. त्यांच्याविषयीचे वर्तमान यरुशलेमेतल्या मंडळीच्या कानी आले तेव्हा त्यांनी बर्णबाला अंत्युखियास पाठवले. तो तेथे पोहचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला; आणि त्याने त्या सर्वांना बोध केला की, ‘दृढ निश्‍चयाने प्रभूला बिलगून राहा.’ तो चांगला मनुष्य होता, आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता; तेव्हा प्रभूला पुष्कळ जण मिळाले. नंतर तो शौलाचा शोध करण्यास तार्सास गेला. त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंत्युखियास आणले. मग असे झाले की, त्यांनी तेथे वर्षभर मंडळीमध्ये मिळूनमिसळून बर्‍याच लोकांना शिकवले; आणि शिष्यांना ‘ख्रिस्ती’ हे नाव पहिल्यांदा अंत्युखियात मिळाले. त्या दिवसांत यरुशलेमेहून अंत्युखियास संदेष्टे आले. तेव्हा त्यांच्यातील अगब नावाच्या मनुष्याने उठून आत्म्याच्या योगे सुचवले की, सर्व जगात मोठा दुष्काळ पडणार आहे. हा दुष्काळ क्लौद्याच्या वेळेस पडला. तेव्हा प्रत्येक शिष्याने निश्‍चय केला की, यहूदीयात राहणार्‍या बंधुजनांच्या मदतीकरता यथाशक्ती काही पाठवावे; त्याप्रमाणे त्यांनी केले, म्हणजे ते बर्णबा व शौल ह्यांच्या हाती वडीलवर्गाकडे1 पाठवून दिले.

प्रेषितांची कृत्ये 11:19-30 साठी चलचित्र