YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 23:18-39

२ शमुवेल 23:18-39 MARVBSI

सरूवेचा पुत्र यवाबाचा भाऊ अबीशय हा तिघांचा प्रमुख होता. त्याने आपला भाला तीनशे माणसांवर चालवून त्यांना ठार केले व त्या तिघांमध्ये त्याने नाव मिळवले. त्या तिघांहून त्याची महती अधिक होती म्हणून तो नायक झाला ना? तरी त्या पहिल्या तिघांच्या योग्यतेस तो पोहचला नाही. कबसेल येथला एक माणूस होता; त्याने पुष्कळ पराक्रम केले होते; त्याच्या यहोयादा नामक पुत्राचा बनाया म्हणून एक पुत्र होता, त्याने मवाबी अरीएल ह्याच्या दोघा पुत्रांना ठार मारले; आणि बर्फाच्या दिवसांत कूपात उतरून एका सिंहाला ठार केले. त्याने एका धिप्पाड मिसरी पुरुषाला ठार मारले; त्या मिसर्‍याच्या हाती भाला होता, पण बनाया केवळ एक काठी घेऊन त्याच्यावर चालून गेला; व त्याने त्या मिसर्‍याच्या हातचा भाला हिसकावून घेऊन त्याच भाल्याने त्याचा वध केला. असे करून यहोयादाचा पुत्र बनाया ह्याने त्या तिघा वीरांमध्ये नाव मिळवले. त्या तिघांहून त्याची महती मोठी होती तरी पहिल्या तिघांच्या योग्यतेस तो पोहचला नाही. दाविदाने त्याला आपल्या हुजरातीवर नेमले. यवाबाचा भाऊ असाएल ह्या तिसांपैकी होता; बेथलेहेमच्या दोदोचा पुत्र एलहानान, शाम्मा हरोदी, अलीका हरोदी, हेलस पलती, इक्केश तकोई ह्याचा पुत्र ईरा, अबीएजर अनाथोथी, मबुन्नय हूशाथी, सलमोन अहोही, महरय नटोफाथी, बाना नटोफाथी ह्याचा पुत्र हेलेब, बन्यामिन्यांच्या गिबातला रीबय ह्याचा पुत्र इत्तय, बनाया पिराथोनी, गाशाच्या ओढ्याजवळचा हिद्दय, अबी-अलबोन, अर्वाथी, अजमावेथ बरहूमी, अलीहबा शालबोनी, याशेनाच्या पुत्रांतील योनाथान, शाम्मा हरारी, शारार अरारी ह्याचा पुत्र अहीयाम, माकाथीचा पुत्र अहसबय ह्याचा पुत्र अलीफलेट, अहीथोफेल गिलोनी ह्याचा पुत्र अलीयम, हेस्री कर्मेली, पारय अर्बी, सोबातील नाथोन ह्याचा पुत्र इगाल, बानी यादी, सेलक अम्मोनी, सरूवेचा पुत्र यवाब ह्याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी, ईरा इथ्री, गारेब इथ्री, उरीया हित्ती, मिळून एकंदर सदतीस.