YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 23:1-7

२ शमुवेल 23:1-7 MARVBSI

दाविदाची शेवटची वचने ही आहेत : “ज्याला उच्चपदावर चढवले, जो याकोबाच्या देवाचा अभिषिक्त, जो इस्राएलाचा मधुर स्तोत्र गाणारा, तो इशायाचा पुत्र दावीद असे म्हणतो : परमेश्वराचा आत्मा माझ्या द्वारे म्हणाला, त्याचे वचन माझ्या जिव्हेवर आले. इस्राएलाचा देव म्हणाला, इस्राएलाचा दुर्ग मला म्हणाला, मानवांवर न्यायाने राज्य करणारा, देवाचे भय धरून त्यांच्यावर राज्य करणारा निर्माण होईल. सूर्योदयीच्या प्रभातेसारखा तो उदय पावेल, निरभ्र प्रभातेसारखा तो असेल, पर्जन्यवृष्टीनंतर सूर्यप्रकाशाने जमिनीतून हिरवळ उगवते तसा तो उगवेल. माझ्या घराण्याचा देवाशी असा संबंध नाही काय? कारण त्याने माझ्याशी निरंतरचा करार केला आहे; तो सर्व प्रकारे यथास्थित व निश्‍चित आहे; माझा संपूर्ण उद्धार व अभीष्ट ह्यांचा तो उदय होऊ देणार नाही काय? सर्व अधर्मी लोकांना काट्यांप्रमाणे टाकून देतील, कारण त्यांना हाती धरता येत नाही; जो कोणी त्यांना धरू पाहील त्याला लोखंड व भाल्याचा दांडा घेतला पाहिजे; ती आग लागून जागच्या जागी भस्म होतील.”