YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 11:1-5

२ शमुवेल 11:1-5 MARVBSI

राजे लोक युद्धांच्या मोहिमेस जातात त्या वेळी म्हणजे वर्षारंभी दाविदाने यवाबाला व त्याच्याबरोबर त्याच्या नोकरचाकरांना व सर्व इस्राएल लोकांना पाठवले; त्यांनी अम्मोन्यांचा संहार करून राब्बा नगरास वेढा घातला; पण दावीद यरुशलेमेतच राहिला. संध्याकाळच्या वेळी दावीद पलंगावरून उठून राज-मंदिराच्या गच्चीवर जाऊन फिरू लागला; तेव्हा एक स्त्री स्नान करताना त्याने तेथून पाहिली; ती स्त्री दिसायला फार सुंदर होती. मग दाविदाने चाकर पाठवून त्या स्त्रीविषयी विचारपूस केली; तेव्हा कोणी म्हटले, “ती अलीयामाची कन्या व उरीया हित्ती ह्याची बायको बथशेबा आहे ना?” तेव्हा दाविदाने जासूद पाठवून तिला बोलावून आणले, ती दाविदाकडे आली आणि दाविदाने तिच्याशी समागम केला; (ती आपल्या अशुद्धतेपासून शुद्ध झाली होती.) मग ती आपल्या घरी गेली. त्या स्त्रीला गर्भ राहिला; तेव्हा तिने दाविदाला निरोप पाठवून सांगितले, ‘मी गरोदर आहे.’