मग दाविदाने शौल व त्याचा पुत्र योनाथान ह्यांच्यासंबंधाने पुढील विलापगीत गाईले; आणि हे धनुष्य नामक गीत यहूद्यांना शिकवण्याची आज्ञा केली; पाहा, हे गीत याशाराच्या पुस्तकात लिहिलेले आहे : “हे इस्राएला, तुझा शिरोमणी उच्च स्थानी वधला आहे. बलाढ्य पाहा कसे पतन पावले आहेत! गथात हे सांगू नका, अष्कलोनच्या आळ्यांत हे जाहीर करू नका; पलिष्ट्यांच्या कन्या आनंदित होतील, बेसुंत्यांच्या कन्या जयघोष करतील; असे न होवो. गिलबोवाच्या डोंगरांनो, तुमच्यावर दहिवर न पडो, पर्जन्यवृष्टी न होवो नजराणा म्हणून देण्यास तुमच्यासाठी अर्पणयोग्य शेते न होवोत. कारण तेथे पराक्रम्यांची ढाल भ्रष्ट झाली आहे, शौलाची ढाल तैलाभ्यंगावाचून भ्रष्ट होऊन पडली आहे. वधलेल्यांचे रक्त प्राशन केल्यावाचून व बलाढ्यांचे मांदे भक्षण केल्यावाचून योनाथानाचे धनुष्य कधी परत येत नसे, शौलाची तलवार कधी रिकामी परतत नसे. शौल व योनाथान प्रेमळ व मनमिळाऊ असत; जीवनात व मरणात त्यांचा वियोग झाला नाही. ते गरुडाहून वेगवान व सिंहाहून बलवान होते. इस्राएली कन्यांनो, शौलासाठी रुदन करा; तो तुम्हांला किरमिजी वस्त्रे लेववून शृंगारित असे; तो तुमच्या वस्त्रांवर सोन्याचे अलंकार घालीत असे. रणभूमीवर बलाढ्य पाहा कसे पतन पावले आहेत! योनाथाना, तू उच्च स्थानी वधला गेला आहेस! माझ्या बंधो, योनाथाना, मी तुझ्याकरिता विव्हळ होत आहे. तू माझ्यावर फार माया करत असायचास. तुझे माझ्यावर विलक्षण प्रेम होते, स्त्रियांच्या प्रेमाहूनही ते अधिक होते. बलाढ्य पाहा कसे पतन पावले आहेत! युद्धाची शस्त्रे कशी नाश पावली आहेत!”
२ शमुवेल 1 वाचा
ऐका २ शमुवेल 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ शमुवेल 1:17-27
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ