YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 6:1-7

२ राजे 6:1-7 MARVBSI

संदेष्ट्यांच्या शिष्यांनी अलीशाला म्हटले, “पाहा,आम्ही आपणासमोर राहत आहोत ते स्थळ फार अपुरे आहे. तर यार्देनेतीरी जाऊन तेथून एकेकाने एकेक तुळई आणून राहण्यासाठी एक आश्रम बांधावा म्हणून आम्हांला परवानगी द्या.” त्याने म्हटले, “बरे, जा.” एकाने त्याला म्हटले, “कृपा करून आपण आपल्या सेवकांबरोबर या.” तो म्हणाला, “बरे, येतो.” तो त्यांच्याबरोबर गेला. ते यार्देनेकडे येऊन लाकडे तोडू लागले. एक जण तुळई तोडून पाडत असता कुर्‍हाड दांड्यातून निसटून पाण्यात पडली तेव्हा तो ओरडून म्हणाला, “हायहाय! स्वामी, मी ती मागून आणली होती.” देवाच्या माणसाने विचारले, “ती कोठे पडली?” त्याने ती जागा दाखवल्यावर अलीशाने एक लाकूड तोडून तेथे टाकले तेव्हा लोखंड पाण्यावर तरंगू लागले. त्याने म्हटले, “ती काढून घे.” मग त्याने हात लांब करून ती घेतली. अलीशा व अरामी