YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 5:15-18

२ राजे 5:15-18 MARVBSI

नंतर तो बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला व त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला, “अखिल पृथ्वीत इस्राएलाबाहेर देव नाही हे मला आता कळून आले आहे; तर आता आपल्या सेवकाचा नजराणा स्वीकारावा.” तो म्हणाला, “ज्या परमेश्वराच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ मी काहीएक घेणार नाही.” त्याने त्याला पुष्कळ आग्रह केला तरी तो काही घेईना. तेव्हा नामान म्हणाला, “एवढी तरी निदान कृपा करा की आपल्या दासाला दोन खेचरांच्या ओझ्याची माती द्या; कारण ह्यापुढे आपला सेवक परमेश्वराशिवाय इतर कोणत्याही देवांना होमबली अर्पण करणार नाही की यज्ञही करणार नाही. परमेश्वराने आपल्या दासाला एका गोष्टीची मात्र क्षमा करावी; म्हणजे माझा धनी रिम्मोन दैवताच्या मंदिरात पूजा करायला जातो तेव्हा मी त्याच्याजवळ असतो, आणि रिम्मोन दैवताच्या मंदिरात गेल्यावर त्याला मी नमन करत असतो; ह्याप्रमाणे रिम्मोनाच्या मंदिरात जाऊन मी त्याला नमन करीन तेव्हा परमेश्वराने आपल्या दासाला क्षमा करावी.”