अलीशा पुन्हा गिलगाल येथे गेला तेव्हा देशात दुष्काळ पडला होता, आणि संदेष्ट्यांचे शिष्य त्याच्यासमोर बसले असताना त्याने आपल्या सेवकाला सांगितले, “चुलीवर मोठे बहुगुणे ठेवून संदेष्ट्यांच्या शिष्यांसाठी शाकभाजी रांध.” तेव्हा एक माणूस बाहेर रानात शाकभाजी गोळा करण्यासाठी गेला असता त्याला एक रानवेल सापडली; तिच्यावरील कडू इंद्रायणे तोडून त्याने ओटीत भरून आणली; ती चिरून त्या शाकभाजीच्या बहुगुण्यात घातली; ती कडू होती हे त्यांना ठाऊक नव्हते. त्यांनी ती भांड्यातून काढून त्या माणसांना वाढली. ती खाताच लोक ओरडून म्हणाले, “देवाच्या माणसा, बहुगुण्यात मरण आहे.” त्यांच्याने ते खाववेना. अलीशा म्हणाला, “थोडे सपीठ आणा, ते त्याने त्या बहुगुण्यात टाकून त्यांना म्हटले, आता ह्या लोकांना ते वाढा म्हणजे ते ते खातील.” मग त्या बहुगुण्यात काही अपायकारक पदार्थ राहिला नाही.
२ राजे 4 वाचा
ऐका २ राजे 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ राजे 4:38-41
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ