YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 25:3-7

२ राजे 25:3-7 MARVBSI

चवथ्या महिन्याच्या नवमीपासून नगरात एवढी महागाई झाली की देशाच्या लोकांना काही खायला मिळेना. मग नगराच्या तटाला एक खिंड पाडण्यात आली; दोन्ही तटांच्यामध्ये जी वेस राजाच्या बागेजवळ होती त्या वाटेने सर्व योद्धे रातोरात पळून गेले; नगरास खास्द्यांचा वेढा पडलाच होता; इकडे राजाने अराबाचा रस्ता धरला. तेव्हा खास्दी सेनेने राजाचा पाठलाग करून त्याला यरीहोच्या मैदानात गाठले व त्याच्या सर्व सैन्याची दाणादाण केली. ते राजाला पकडून रिब्ला येथे बाबेलच्या राजाकडे घेऊन गेले; त्यांनी त्याची शिक्षा ठरवली. त्यांनी सिद्कीयाच्या पुत्रांचा त्याच्या डोळ्यांदेखत वध केला आणि सिद्कीयाचे डोळे फोडून त्याला बेड्यांनी जखडून बाबेलास नेले.