यहूदाचा राजा यहोयाखीन ह्याच्या बंदिवासाच्या सदतिसाव्या वर्षी म्हणजे ज्या वर्षी बाबेलचा राजा अबील-मरोदख राजा झाला, त्याच्या बाराव्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी त्याने यहूदाचा राजा यहोयाखीन ह्याला कारागृहातून काढून त्याचा सत्कार केला. त्याच्याशी त्याने गोड भाषण करून बाबेलात जे राजे त्याच्या बंदीत होते त्यांच्याहून त्याला उच्च आसन दिले. त्याने आपली कारागृहातील वस्त्रे बदलली व तो आमरण नित्य राजाच्या पंक्तीस जेवत असे. त्याच्या निर्वाहासाठी त्याला राजाने कायमची नेमणूक करून दिली, ती त्याला आमरण नित्य मिळत होती.
२ राजे 25 वाचा
ऐका २ राजे 25
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ राजे 25:27-30
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ