YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 25:22-26

२ राजे 25:22-26 MARVBSI

यहूदा देशातील जे लोक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने राहू दिले होते त्यांच्यावर त्याने गदल्या बिन अहीकाम बिन शाफान ह्याला सुभेदार नेमले. बाबेलच्या राजाने गदल्यास सुभेदार नेमले हे सेनानायकांनी व त्याच्या लोकांनी ऐकले, तेव्हा इश्माएल बिन नथन्या, योहानान बिन कारेह, सराया बिन तान्हुमेथ, नटोफाथी आणि याजन्या बिन माकाथी व त्यांचे सर्व पुरुष मिस्पा येथे गदल्या ह्याच्याकडे आले. तेव्हा गदल्या आणभाक करून त्यांना व त्यांच्या माणसांना म्हणाला, “खास्द्यांच्या अधिकार्‍यांची भीती धरू नका; देशात राहून बाबेलच्या राजाचे अंकित व्हा, म्हणजे तुमचे बरे होईल.” सातव्या महिन्यात राजवंशातला इश्माएल बिन नथन्या बिन अलीशामा ह्याने दहा माणसांसह येऊन गदल्याला ठार मारले; तसेच मिस्पा येथे त्याच्याबरोबर असलेले यहूदी व खास्दी ह्यांनाही त्याने ठार मारले. तेव्हा लहानथोर सर्व लोक आणि सेनांचे नायक मिसर देशाला निघून गेले; त्यांना खास्द्यांचा धाक पडला होता.