त्याच्या कारकिर्दीत बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या सेवकांनी यरुशलेमेवर स्वारी करून नगराला वेढा दिला. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या सेवकांनी नगराला वेढा घातला असताना तो स्वतः तेथे आला; तेव्हा यहूदाचा राजा यहोयाखीन आपली आई, सेवक, सरदार व खोजे ह्यांना बरोबर घेऊन बाबेलच्या राजाकडे गेला; बाबेलच्या राजाने आपल्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी त्याला पकडले. मग त्याने परमेश्वराच्या मंदिरात व राजवाड्यात ठेवलेले सारे धन लुटून नेले; शलमोन राजाने जी सोन्याची पात्रे करून परमेश्वराच्या मंदिरात ठेवली होती ती सर्व फोडून त्यांचे त्याने तुकडे केले; तसे होणार हे परमेश्वराने सांगितलेच होते. त्याने अवघे यरुशलेम म्हणजे सर्व सरदार, सर्व पराक्रमी वीर मिळून एकंदर दहा हजार लोक आणि सर्व कारागीर व लोहार ह्यांना कैद करून नेले; देशात अगदी कंगाल लोकांखेरीज कोणी राहिले नाही. त्याने यहोयाखीनास बाबेलास नेले; राजाची आई, राजाच्या स्त्रिया, खोजे व देशातील मोठमोठे लोक ह्यांना त्याने कैद करून यरुशलेमेहून बाबेलास नेले. एकंदर सात हजार धट्टेकट्टे लोक आणि एक हजार कारागीर व लोहार बाबेलच्या राजाने कैद करून बाबेलास नेले; हे सारे युद्धास लायक व बळकट होते. बाबेलच्या राजाने त्याच्या जागी त्याचा चुलता मत्तन्या ह्याला राजा केले; त्याने त्याचे नाव बदलून सिद्कीया असे ठेवले.
२ राजे 24 वाचा
ऐका २ राजे 24
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ राजे 24:10-17
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ