यहोयाकीमाच्या कारकिर्दीत बाबेलचा राजा नबुखद्नेसर ह्याने स्वारी केली; यहोयाकीम तीन वर्षे त्याचा अंकित होऊन राहिला; मग त्याने त्याच्यावर उलटून बंड केले. परमेश्वराने आपले सेवक संदेष्टे ह्यांच्या द्वारे सांगितलेल्या वचनाप्रमाणे यहूदाचा नाश करावा म्हणून त्याच्यावर खास्दी, अरामी, मवाबी व अम्मोनी ह्यांच्या टोळ्या पाठवल्या. यहूदी लोकांना आपल्यासमोरून घालवावे म्हणून नि:संशय हे सर्व परमेश्वराच्या आज्ञेने यहूदावर आले; मनश्शेने केलेल्या सर्व पापकर्मांमुळे व त्याने निरपराध जनांचा रक्तपात केल्यामुळे असे झाले. त्याने यरुशलेम निरपराध जनांच्या रक्ताने भरून टाकले म्हणून परमेश्वर क्षमा करीना.
२ राजे 24 वाचा
ऐका २ राजे 24
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ राजे 24:1-4
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ