YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 18:9-12

२ राजे 18:9-12 MARVBSI

हिज्कीया राजाच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी म्हणजे इस्राएलाचा राजा होशे बिन एला ह्याच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी अश्शूरचा राजा शल्मनेसर ह्याने शोमरोनावर स्वारी करून त्याला वेढा दिला. तीन वर्षांच्या अखेरीस त्याने ते सर केले; हिज्कीयाच्या कारकिर्दीच्या सहाव्या वर्षी म्हणजे इस्राएलाचा राजा होशे ह्याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी शोमरोन सर करण्यात आले. मग अश्शूराच्या राजाने इस्राएलास पाडाव करून अश्शूर देशात नेले आणि हलह व हाबोर येथे आणि गोजान नदीतीरी व मेद्यांच्या नगरांत त्यांना वसवले; ह्याचे कारण हेच की त्यांनी आपला देव परमेश्वर ह्याची वाणी मानली नाही व त्याचा करार मोडला; परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने विहित केलेले सर्वकाही त्यांनी जुमानले नाही; ते, ते ऐकेनात व त्याप्रमाणे वागेनात.