YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 18:13-18

२ राजे 18:13-18 MARVBSI

हिज्कीया राजाच्या कारकिर्दीच्या चौदाव्या वर्षी अश्शूरचा राजा सन्हेरीब ह्याने यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांवर चढाई करून ती घेतली. यहूदाचा राजा हिज्कीया ह्याने अश्शूराच्या राजाला लाखीश येथे सांगून पाठवले की, “माझ्या हातून अपराध झाला आहे, आता माझ्याकडून परत जा; आपण माझ्यावर जो बोजा लादाल तो मी सहन करीन.” यहूदाचा राजा हिज्कीया ह्याने तीनशे किक्कार1 चांदी व तीस किक्कार सोने खंडणी द्यावी असे अश्शूराच्या राजाने ठरवले. परमेश्वराच्या मंदिरात व राजवाड्याच्या भांडारात जेवढी चांदी मिळाली तेवढी हिज्कीयाने त्याला दिली. त्या वेळी हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे व दारबाह्या ह्यांवर जी सोन्याची मढणी केली होती ती काढून अश्शूराच्या राजाला दिली. एवढ्यावरही अश्शूराच्या राजाने तर्तान, रब-सारीस व रब-शाके (उच्चाधिकारी) ह्यांना मोठ्या सैन्यानिशी लाखीशाहून यरुशलेमेस हिज्कीयाकडे पाठवले. ते यरुशलेमेला जाऊन परटाच्या शेताजवळच्या वरच्या तळ्याच्या नळानजीक येऊन ठेपले. त्यांनी राजाला बोलावणे पाठवले तेव्हा खानगी कारभारी एल्याकीम बिन हिल्कीया, चिटणीस शेबना व बखरनवीस यवाह बिन आसाफ हे त्याच्याकडे गेले.