YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 17:1-4

२ राजे 17:1-4 MARVBSI

यहूदाचा राजा आहाज ह्याच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी होशे बिन एला हा शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला; त्याने नऊ वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते त्याने केले, तरी ते त्याच्यापूर्वी होऊन गेलेल्या इस्राएलाच्या राजांएवढे नव्हते. अश्शूरचा राजा शल्मनेसर हा त्याच्यावर चढाई करून आला; होशे त्याचा अंकित झाला व त्याने त्याला खंडणी दिली. अश्शूराच्या राजाला होशेची फितुरी दिसून आली; त्याने मिसर देशाचा राजा सो ह्याच्याकडे जासूद पाठवले आणि दरवर्षी जी खंडणी तो अश्शूराच्या राजाला देत असे ती देण्याचे त्याने बंद केले, म्हणून अश्शूराच्या राजाने त्याला पकडून बेड्या घालून कारागृहात ठेवले.