तेव्हा अश्शूराचा राजा तिग्लथ-पिलेसर ह्याच्या भेटीसाठी आहाज राजा दिमिष्क येथे गेला; त्याने तेथील वेदी पाहून तिचा आकार व तिची घडण ह्यांचा नमुना उरीया याजकाकडे पाठवून दिला. आहाज राजाने दिमिष्काहून पाठवलेल्या त्या नमुन्याप्रमाणे उरीया याजकाने एक वेदी आहाज राजा दिमिष्काहून येण्यापूर्वी तयार केली. राजा दिमिष्काहून परत आला तेव्हा त्याने ती वेदी पाहिली; त्याने त्या वेदीजवळ जाऊन तिच्यावर बली अर्पण केले. त्या वेदीवर त्याने आपले होमबली व अन्नबली ह्यांचे होम केले, आपली पेयार्पणे तिच्यावर ओतली व आपल्या शांत्यर्पणांच्या बलींचे रक्त त्या वेदीवर शिंपडले. परमेश्वरापुढे असलेली पितळेची वेदी जी मंदिरापुढे म्हणजे वेदी व परमेश्वराचे मंदिर ह्यांच्या दरम्यान होती ती तेथून काढून त्याने तयार केलेल्या ह्या वेदीच्या उत्तरेकडे ठेवली. आहाज राजाने उरीया याजकाला आज्ञा केली की, “नित्य सकाळचा होमबली, संध्याकाळचा अन्नबली, राजाचे होमबली व अन्नबली, आणि देशातील सगळ्या लोकांचे होमबली व पेयार्पणे ही मोठ्या वेदीवर अर्पावीत; होमबली व इतर यज्ञपशू ह्यांचे रक्त त्या वेदीवर शिंपडावे; पितळेची वेदी माझ्यासाठी शकुन पाहण्यासाठी असावी.” आहाज राजाच्या आज्ञेप्रमाणे उरीया याजकाने केले. मग आहाज राजाने बैठकीवरले नक्षीकाम काढून टाकले आणि त्यावर असलेले गंगाळ काढले, आणि गंगाळसागर पितळी बैलांवरून काढून खाली फरसबंदीवर ठेवला. शब्बाथ दिवसासाठी जी चांदणी मंदिरात बांधली होती ती व राजाला बाहेरून प्रवेश करण्यासाठी जे दार केले होते ते, ही दोन्ही मंदिरापासून वेगळी करण्यात आली.
२ राजे 16 वाचा
ऐका २ राजे 16
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ राजे 16:10-18
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ