अहज्याची आई अथल्या हिने आपला पुत्र मेला आहे असे पाहिले तेव्हा तिने उठून सर्व राजवंशाचा संहार केला. तरी योराम राजाची कन्या व अहज्याची बहीण यहोशेबा हिने अहज्याचा पुत्र योवाश ह्याला त्या वधायच्या राजपुत्रांतून चोरून नेले आणि त्याला व त्याच्या दाईला बिछाने ठेवण्याच्या कोठडीत लपवून ठेवले; त्याला अथल्येच्या दृष्टिआड केल्यामुळे त्याचा वध झाला नाही. आणि परमेश्वराच्या मंदिरात त्याला सहा वर्षे तिच्याजवळ लपवून ठेवले होते. इकडे अथल्येने देशावर राज्य केले.
२ राजे 11 वाचा
ऐका २ राजे 11
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ राजे 11:1-3
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ