तीताच्या मनात तुमच्याविषयी तशीच कळकळ उत्पन्न करणार्या देवाची स्तुती असो. कारण त्याने आमची सूचना तर मान्य केलीच; पण तो स्वतःच फार उत्सुक असल्यामुळे आपण होऊन तुमच्याकडे निघून गेला. त्याच्याबरोबर आम्ही एका बंधूला पाठवले आहे; सुवार्तेसंबंधी मंडळ्यांतून त्याची सर्वत्र प्रशंसा झाली आहे;1 इतकेच केवळ नाही तर प्रभूचा गौरव व्हावा व आमची उत्सुकता दृष्टोत्पत्तीस यावी म्हणून आम्ही करत असलेल्या ह्या कृपेच्या कार्यात आम्हांला प्रवासात सोबत करण्यासाठी मंडळ्यांनी त्याला नेमले. आमच्याकडून चालवलेल्या ह्या औदार्याच्या कार्यात कोणालाही आम्हांला दोष लावता येऊ नये म्हणून तजवीज करण्यात आली आहे; कारण आम्ही ‘प्रभूच्या दृष्टीने जे मान्य’, इतकेच नव्हे तर ‘मनुष्यांच्याही’ दृष्टीने जे मान्य, ते करण्याची खबरदारी घेतो. त्यांच्याबरोबर आम्ही आमच्या दुसर्या एका बंधूला पाठवले आहे.2 त्याच्या उत्सुकतेची पारख आम्ही पुष्कळ गोष्टींत अनेक वेळा केली आहे; आणि आता तुमच्यावर त्याचा फार भरवसा असल्यामुळे तो अधिक उत्सुक आहे. तीताविषयी कोणी विचारील तर तो माझा साथी व तुमच्याकरता माझा सहकारी साथी आहे; आमच्या बांधवांविषयी म्हणाल तर ते मंडळ्यांचे जासूद, ख्रिस्ताचे भूषण असे आहेत. म्हणून त्यांना तुम्ही आपल्या प्रीतीचे आणि तुमच्या-विषयीच्या आमच्या अभिमानाचे प्रमाण मंडळ्यांसमक्ष दाखवा.
२ करिंथ 8 वाचा
ऐका २ करिंथ 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ करिंथ 8:16-24
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ